जी लोक स्त्रीचा सन्मान करण्याच्या गप्पा मारतात तीच माणसं वंशाला दिवा पाहिजे म्हणून गपचूप लिंग तपासणी करतात लग्न झाल्यानंतर नवदांपत्यांना वर्ष दोन वर्ष उलटून गेले आणि नवीन बाळाची काही चाहूल लागेना अशा वेळेस सर्व कुटुंबीय नवस करायला तयार होतात की
Saturday, May 27, 2023
निरर्थक शब्द
संवाद-बोलणं या सर्वांमध्ये शब्दांना खूप महत्त्व आहे चारचौघात गप्पा मारताना लोक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात उच्च विचारांच्या गोष्टी बोलतात लोकं सोशल मीडियावर लिहितात वृत्तपत्रातील लिहितात व्याख्यान पण देतात आजकाल तर फेसबुक व्हाट्सअप सारख्या आभासी जगामध्ये चांगले सुविचार संतांचे विचार फॉरवर्ड करण्याचा किंवा स्टेटस ठेवण्याचा एक प्रकार चालू आहे लोक समुदायासमोर काहीतरी वेगळच बोलत असतात आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्याविरुद्ध जगणं जगत असतात अशा लोकांची कीव येते प्रतिष्ठा पैसा आणि प्रसिद्धीसाठी लोक काहीही करू शकतात याची प्रचिती जवळून आली आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव देखील आला आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment