आंब्याच्या कोया
ऊन खूप तापलेले असायचे.आम्ही गल्लीतले सर्व मित्र कुठल्यातरी झाडाखाली किंवा सावलीला तासनतास खेळत बसायचो.घरच्या लोकांची फक्त
एकच ताकीद असायची अरे उन्हात जाऊ
नका.बरोबर नेम धरून कोय
उडवायची जिंकलेल्या सर्व कोया
जमा करायच्या. डाव झाल्यावर प्रत्येकाने आप्पापल्या कोया प्लास्टिकच्या पिशवीत भरायच्या आणि घरी
आणायच्या.त्यावेळी जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.घरी आंबे आणल्यावर एकही कोय बाहेर फेकून दिली जाणार नाही याची काळजी घेतली जायची.घरच्या कोयांपेक्षा थोड्या जरी
जास्त जिंकल्या तरी खूप
आनंद वाटायचा.आम्ही लहानपणी आंब्याच्या या कोया एकमेकांना उसन्या पण द्यायचो.काही गरीब
मुलं कचऱ्यातील कोया आणायचे आम्हाला त्या जिंकल्या तरी नको वाटायच्या.पण काही चांगल्या घरची मुलं केशरी रंगाचा स्वच्छ धुतलेल्या कोया आणत असंत. त्या मात्र आपणच
जिंकाव्या असं प्रत्येकाला वाटायचं. कोयांपासून साबण बनवतात अशी पण एक अफवा त्या
वेळी पसरली होती.बरं मग विकायच्या कुठं तर भंगारवाला किंवा रद्दीवल्याकडे.मुळात हा जावईशोध कुणी लावला होता तो पटठ्या काही सापडला नाही.उन्हाळायात जमवलेल्या कोया काहीजण मामाच्या गावाला घेऊन
जायचे.शेतात आंब्याची झाडं लावायला.त्यातली किती झाडं
यायची हे मामालाच माहीत.
उन्हाळा संपत आला
की पावसाळ्याच्या तोंडावर बऱ्याच ठिकाणी या कोया उगवून यायच्या.मग आम्ही त्याची मस्त पिपाणी बनवायचो.आणि ती वाजवत फिरणे हा पण एक उद्योग्य होता.
पुढे पावसाळा सुरू झाला की त्या कोयांचं काय व्हायचं काळाच्या ओघात त्या कुठे जायच्या हे पुढचा उन्हाळा सुरू होईपर्यंत कुणाच्या ध्यानी पण येत नव्हते.आंब्याचा रस खाऊन उरलेला भाग म्हणजे टाकाऊ कोयंपासून आम्ही आमचं बालपण टिकाऊ करत होतो.
आंब्याच्या कोया खेळणे हा खेळ खूप जुना आहे.
मोबाईल आणि टीव्ही च्या नादात मुलांचे बालपण कुठे हरवत आहे हेच कळत नाही.
No comments:
Post a Comment