Saturday, June 14, 2025

फादर्स डे

 कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.लहान सहान गोष्टींसाठी आईची आठवण येते.पण खूप मोठ्या गोष्टी घडल्यास वडीलच आठवतात.बापरे! आपण आपसूकच म्हणतो.वडील म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला हिरो.आपल्या आयुष्याचा मार्गदर्शक.आईला रोजच्या जेवणाचा प्रश्न असतो तर बापाला मुलांच्या आयुष्याच्या शिदोरीची चिंता असते.बापाला सर्वांसमोर रडता येत नसते.मन त्यालाही असते पण व्यक्त करता येत नाही.एखादी व्यक्ती जेव्हा बाप होते तेव्हा त्याला स्वतःच्या वडिलांचे मन कळते.बऱ्याचदा मुलांसमोर वडील अडचणी बोलून दाखवत नाहीत.मुलांनी स्वतः त्या समजून घ्याव्या असंही त्यांना वाटत नाही.
            स्वतःची मुलं मोठी होईपर्यंत ज्यांना वडिलांचे छत्र असते ती लोकं खूप नशीबवान असतात.काहींना वडिलांचे महत्व असते.खूप काळजी घेतात.पण काही लोक फक्त शरीराने मोठी होतात. कितीही वय वाढले तरी ती वडिलांवर अवलंबून असतात.माझं काही दुखतंय मला आता होत नाही असे स्पष्ट सांगणारे वडील कमीच असतात.
          काहींना असं वाटतं आपण मुलांना वस्तू ,सुविधा दिल्या म्हणजे झालं आपल्याकडे भरपूर पैसे आहेत.काहीही खरेदी करून देऊ.पण त्यापेक्षा महत्वाचं मुलांना वेळ देणं.आणि वडील म्हातारे झाल्यानंतर मुलांनी त्यांना वेळ देणं.