पाणीटंचाई कारणे काय उपाय कसे करता येईल.लेख वाचण्यासाठी येथे भेट द्या..पाणीटंचाई
सध्याच्या काळात पाणी ही भीषण समस्या आहे.पाणी टंचाई निसर्ग निर्मित आहे की मानवनिर्मित ? मानवनिर्मित म्हणल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल ते कसं काय ? साधं गणित आहे.एखाद्या वर्षी नसेल पडला पाऊस पण काय दरवर्षी पडत नाही.जलचक्र थोडं पुढं गेलं असेल पण पाऊस पडतोच ना ? आता काहीजण म्हणतात पूर्वी पडायचा तसा पडत नाही.उत्तर साधं आहे पूर्वी होती तेवढी झाडं आहेत का आत्ता!फार पूर्वी नाही साधारण ४० ते ५० वर्षांपूर्वी सामान्य माणसाच्या गरजा कमी होत्या आणि त्या सर्व निसर्गा वर अवलंबून होत्या.साधी माणसं जीवनमान ही साधं होतं. स्वातंत्र्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट झाला तशी अन्नधान्याची गरज वाढू लागली त्यामुळे हरितक्रांतीची झाली आणि पीक उत्पादन वाढले पण गरजा मर्यादित होत्या त्यामुळे लगेच काही दुष्परिणाम जाणवले नाहीत.रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर प्रचंड वाढला.शेतात जी काही लाकडी अवजारे होती,अगदी बैलगाडी सारखी साधने तयार करायला ही लाकूड लागायचे.पूर्वी इंधन म्हणूनही लाकडाचा वापर जास्त व्हायचा.पूर्वी माळवादाची घरे असायची,त्यासाठीही लाकूड लागायचे. एकंदरीत काय तर झाडं लावण्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता.सोबतच झाडे लावायची त्यांचे संवर्धन करायचे जीवापाड जपायचे याचे संस्कार लहानपणी आजोबांकडून,मामांकडुन नकळत व्हायचे आणि आमच्या आजोबा पणजोबांनी झाडे लावली म्हणून आम्ही त्याची फळे खात आहोत मग आता आम्हीही लावतो पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल असा विचार त्या काळी जनमानसात होता.मागच्या दोन दशकात जग वेगाने बदलत आहे.तसे हवामान ही बदलत आहे.कमी पाऊसमान,कडाक्याची थंडी,कमालीची उष्णता यावर उपाय काय ?
पावसाचे पडणारे व पळणारे पाणी त्याला चालायला शिकवले पाहिजे,चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावले पाहिजे आणि थांबलेले म्हणजेच साठलेले पाणी जिरले पाहिजे.
गावचे पाणी गावच्या शिवारात जिरले पाहिजे मुरले पाहिजे. देणारा कधीच कमी देत नाही आपलीच झोळी फाटकी असेल तर त्याला(विधात्याला) दोष देण्यात काय अर्थ ? माती शास्त्र,भूगर्भ शास्त्र,पाणी शास्त्र समजून घेऊन प्रत्येक गावाने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.मुळातच पाण्याचा खूप मोठा स्त्रोत जरी धरण, तलाव, तळी स्वरूपात दिसत असला तरी त्यातील बरेच शे पाणी बाष्पीभवनाने कमी होते व काही पाणी मृत साठा स्वरूपात असते. दरवर्षी दुष्काळाची दाहकता वाढत आहे तापमान नवीन रेकॉर्ड तयार करत आहे .

मध्यंतरी कुठल्या तरी गावात नदी नांगरून जलस्तर वाढल्याचे वाचले. नदी नांगरली म्हणजे काय केले पाणी जिरवले. जेव्हा शिवारातले पाणी तंत्रशुढ्ध पद्धतीने गावच्या शिवारात जिरेल मुरेल मग जेव्हा पावसाळयाच्या सुरुवातीची दोन महिने गावातील सर्व जलस्त्रोत भरुन वाहतील मग उर्वरीत पाणी नदी मध्ये वाहले तरी चालेल. गाव परिसरातील प्रत्येक विहीरी, बोअरवेल, हातपंप यांना वर्षभर पाणी राहण्यासाठी या जलस्त्रोतांचे पूनर्भरण देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला पाहिजे. प्रत्येक गावाला राखीव जलसाठा एवढा पाहिजे की एखादया वर्षी दुष्काळ जरी पडला तरी कोणत्याच घराला पाण्यासाठी वणवण फिरावे लागू नये.
कडक दुष्काळात भर उन्हात कुठल्याच आया - बहिणींना घागर , हंडे घेऊन पाण्यासाठी हिंडावे लागणार नाही यासाठी पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास हे होऊ शकते.अधिक तापमान वाढ रोखण्यासाठी वड,पिंपळ,आंबा,चिंच,जांभूळ,शिसम आणि अशाच प्रकारची झाडे लावावी लागतील. शेतात बांधावर, गायरानात, रस्त्याच्या दुतर्फा, मोक्याच्या जागी झाडे लावायला पाहिजेत. आणि लावायची म्हणून फोटो काढण्या पुरती झाडे लावून उपयोग नाही. प्रत्येकाने लाख झाडांच्या गप्पा मारण्यापेक्षा एकच झाड लावून त्याला जपले तर भरपूर फरक पडेल. दुष्काळाची दाहकता खूप आहे पण हा निसर्ग निर्मित कमी पण आपणच निर्माण केलेला आहे. आणि यावर उपायही आपणच करणार. पाणी या विषयावर लिहीण्या सारखं खूप आहे पण माझा हा छोटासा प्रयत्न. यातून वाचणाऱ्याने आयुष्यात एक जरी झाड लावले तरी हा लेख यशस्वी.↗

प्रदिप सुरवसे